साखर कमी झाल्यावर काय होते?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 16:05

रक्तातली साखर कमी होणे

मधुमेहात आणखीही एक गंभीर धोका असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण उपचारामुळे अचानक कमी झाले तर पेशींचे कामकाज मंदावून ग्लानी (चक्कर) येते. खूप डोके दुखणे, छातीत धडधड, घाम, भीती, थरथर, मळमळ, खूप भूक, थकवा, चक्कर, डोळयाला अंधारी, गोंधळलेली मानसिक अवस्था, कधीकधी झटके आणि बेशुध्दी, इत्यादी परिणाम साखरेचे प्रमाण उतरल्याने होतात. मधुमेहात कडक उपास किंवा जास्त व्यायाम यांपैकी कशानेही रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते. ही अवस्था ओळखता आल्यास रुग्णाला साखर (साधी)किंवा ग्लुकोज खायला दिल्यास लगेच आराम पडू शकतो. हा प्रथमोपचार अगदी साधा आणि जीवरक्षक आहे.

रक्तातील किटो आम्लता वाढणे किंवा साखरेचे प्रमाण कमी होणे या दोन्हीही अवस्था धोकादायक असतात. यावर ताबडतोब उपचार होणे आवश्यक असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info